इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारावेत ?
कोणतीही भाषा शिकताना वा कोणतेही ज्ञान संपादन करताना प्रश्नांना विशेष महत्व असते. तुम्ही प्रश्न कसे विचारता त्यावर उत्तरे अवलंबून असतात. हीच उत्तरे ज्ञान मिळवून देतात.
म्हणजेच उत्तरातूनच ज्ञान मिळते. ज्या माध्यमातून ज्ञान मिळवले जाते 'ते' प्रश्न विचारण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत.
त्या पद्धती कोणत्या ते आपण पाहू.
मराठीत, काय? कोण? कोठे? कसे? कोणाचे? कशाचे? कशासाठी? कोणासाठी? असे शब्द प्रश्न विचारताना वापरतात . तर इंग्रजीत What, Who, Where, When, How, Whom, Whose हे शब्द वापरतात.
'हे काय आहे' असा प्रश्न एखाद्या वस्तूची माहिती मिळवून देतो.
What Is this ? असा इंग्रजी प्रश्न एखाद्या जवळच्या वस्तूचे अस्तित्व दर्शवितो. जवळची वस्तू कोणती आहे ? मग तिथे पुस्तक असेल , पेन असेल , एखादे फुल असेल वा अन्य काहीही असेल. This is a Flower. This is a book. This is a pen. This is a doll. This is a lamp.
'ते काय आहे ?' लांबची वस्तू कोणती आहे असे विचारण्यासाठी हा प्रश्न आहे .
What is that? ते झाड आहे , ती मुलगी आहे , तो पोपट आहे, ती आगगाडी आहे. तो कुत्रा आहे.
That is a tree. That is a girl. That is a parrot. That is a train. That is a dog.
अनेक वचनी वस्तुच्या संदर्भातली माहिती These व Those च्या माध्यमातून याच पद्धतीने मिळविता येते.
What are these fruits? These are mangoes.
What are those animals? Those are cows. .
असे सुमारे ५० शब्द घेवून This, That, These, Those च्या रचनांचा सराव करावा.
What is your name? My name is Suresh, Ramesh, Seeta, Sangeeta, Asif
अशी रचना उत्तरे देताना करा व मग What is his name? असा प्रश्न विचारा. उत्तर His name is Ganpat, Manoj वगैरे.
मग What is her name? तिचे नांव काय? मग त्यांची नांवे काय? What are their names ? What is your father? तुझे वडील काय काम करतात? माझे वडील पुस्तक विक्रेते आहेत.
My father is a Farmer.
कुणाचे वडील Doctor, Barber, Engineer, Watchman, Policeman वा जो उद्योग, नोकरी करत असतील तर तो लिहायचा व अशी २५/३० वाक्ये करायची.
What do you want? तुला काय हवे? I want a pencil. मला पेन्सिल हवी.
What do you like? तुला काय आवडते? I like tea. मला चहा आवडतो. कुणी म्हणेल मला 'रसना' आवडते. कुणाला कॉफी आवडेल. मांजराला दूध आवडते. A cat likes milk.
What ने सुरु होणारे प्रश्न विचारताना काळाचे भान ठेवावे लागते.
What do you want? म्हणजे तुला काय हवे?
आता, तुला काय हवे? (असा अर्थ) वर्तमानकाळात तुला काय हवे? परंतु भूतकाळाचा संदर्भ हवा असेल तर प्रश्न तशा प्रकारे विचारावा लागेल. अशा वेळी do या कियापदाच्या भूतकाळी रुपाचा वापर करावा लागतो.
पहा. What did the boy want? The boy wanted a new bicycle.
मुलाला काय हवे होते? त्याला नवीन सायकल हवी होती.
भूतकाळाच्या संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी What ने प्रश्न विचारलात तर What च्या पुढे Did (did) हे do चे भूतकाळी रूप घालावे, पुढे कर्ता घालावा व शेवटी मूळ क्रियापद घालावे.
उदा. शरदने गोष्टींचे पुस्तक आणले.
ही माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर १ नंबरला What, त्यापुढे did. नंतर Sharad हा कर्ता व शेवटी bring हे (मूळ) क्रियापद
प्रश्न : What did Sharad bring?
उत्तर :- Sharad brought a story book.
आता उत्तर देताना मात्र १ नंबरला कर्ता, (Sharad), २ नंबरला क्रियापदाचा भूतकाळ (hring -brought). नंतर कर्म (काय आणले?) a story book.
प्रश्नवाहक वाक्य मूळ क्रियापद सोबत घेऊन येते तर उत्तर असलेले वाक्य त्या क्रियापदाच्या भूतकाळी रुपाला सोबत आणते.
तू कुठे राहतोस ? खातोस काय? करतोस काय? हे वर्तमानकाळी प्रश्न इंग्रजीत Where do you live? What do you eat? What do you do? असे विचारावे.
तर भूतकाळी Where did you live? What did you eat? What did you do?
असे विचारावे (तू राहिलास कुठे? खाल्लस काय? केलेस काय?)
When do you come to school? तू शाळेत केव्हा येतोस?
तुझ्या शाळेचे हेडमास्तर कोण आहेत? Who is the headmaster of your school?
खाली To go हे क्रियापद तिन्ही काळात चालवून प्रश्नार्थक वाक्ये कशी करायची ते दाखवले
आहे.
साधा वर्तमानकाळ:-
I go - Do I go?
We go - Do we go?
You go - Do you go ?
He goes - Does he go ?
She goes - Does she go ?
It goes - Does it go ?
They go - Do they go ?
चालू वर्तमान काळ:-
I am going - Am I going?
You are going - Are you going?
He,she,It is going - Is He going ?
They are Going - Are they going ?
पूर्ण वर्तमान काळ:-
I have gone - Have I gone?
He, She, It has gone - Has he/she/it gone?
They have gone - have they gone?
साधा भूतकाळ :-
I went - Did I go?
You went - Did you go?
He, She, It went - Did he, she, it go?
They went - Did they go?
चालू भूतकाळ :-
I was going - was I going?
were you going? - werw you going?
Was he, she, It going? - was he,she, it going?
They Were going - Were they going?
पूर्ण भूतकाळ :-
I had gone - Had I gone?
You had gone - Had you gone ?
He,she,it had gone - Had he/she/It gone?
They had gone - Had they gone?
साधा भविष्यकाळ :-
I shall go - shall I go?
You will go - Will you go?
He,she,it will go - Will he, she, It go?
They will go - Will they go?
चालू भविष्यकाळ:-
I shall be going - Shall I be going?
You will be going - Will you be going?
He will be going - Will he be going?
They will be going - Will they be going?
पूर्ण भविष्यकाळ:-
I shall have gone - Shall have I gone?
You will have gone - Will have you gone?
He will have gone - Will have he gone?
They will have gone - Will have they gone?
वरील वाक्ये सूत्र म्हणून पाठ करावीत. त्यातून काळांची उजळणी होईल.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.