मायेची पाखर
प्रश्न १ .एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले ?उत्तर -वस्तीगृहातील मुलांनी बनवलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले .
२)वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणा प्रमाणे होती ?
उत्तर - वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया आई वडिलां प्रमाणे होती .
३)अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले ?
उत्तर - अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले .
४)कर्मवीर भाऊराव आणि कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या ?
उत्तर - कर्मवीर भाऊराव यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या.
5)लेखक कुठे जाण्यासाठी निघाले होते ?
उत्तर - लेखक पुण्याला जाण्यासाठी निघाले होते .
प्रश्न २ .गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा .
१)संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते .
२)स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली .
३)त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती .
४) "अण्णा ,आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात .
प्रश्न ३ .कोण कोणाला म्हणाले ?
१) "आता इथंच मुक्काम करा ! "
उत्तर - असे भाऊराव लेखकांना म्हणाले .
२) " जा रे ,स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू ! "
उत्तर - असे भाऊराव एका मुलाला म्हणाले .
३) " आपणांस उदंड आयुष्य मिळो ! "
उत्तर -असे लेखक भाऊरावांना म्हणाले .
प्रश्न ४ .थोडक्यात उत्तरे लिहा .
१)लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले ?
उत्तर - लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला सांगितले , " जा ,रे स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये . "मुलाने धावत जाऊन स्वयंपाक घरातून पिठले ,भाकरी ,कांदा , तेल एका ताटात घेऊन आला व लेखकांना खायला दिले .
२)मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला ?
उत्तर - मध्यरात्रीनंतर अण्णांनी उठून कंदील घेऊन वस्तीगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही हे पाहून त्यांच्या अंगावर पांघरून आहे का नाही ते पाहिले .एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला पाहून त्याला उचलून आपल्या बिछान्यावर आणून झोपवले .स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली .त्याला पोटाशी धरले त्यामुळे त्या मुलाला गाढ झोप लागली .
३)सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले ?
उत्तर - रात्रीचा प्रसंग डोळ्यांनी पाहिल्यामुळे लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले व अण्णांना म्हणाले, "आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात .या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळो! "
प्रश्न ५ .वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा .
अ गट ब गट
१ )टाळाटाळ करणे - एखादी गोष्ट
करायची टाळणे
२)पोटात कावळे ओरडणे - खूप भूक लागणे
३)डोळा लागणे - झोप लागणे
४)झटत राहणे - सतत प्रयत्न करणे
प्रश्न ६)लेखकांच्या पोटात कावळे ओरडत होते ,म्हणजे लेखकांना खूप भूक लागली होती.

आता पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा .
१)भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते .
उत्तर - अजगरासारखे पडून होते -म्हणजे खाल्ल्यावर अजगर सुस्त पडून राहते त्याप्रमाणे नाना सुस्त पडून होते .
२)दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही ; म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात .
उत्तर - मांजरीच्या पायाचा म्हणजे मांजराच्या पायाखाली आधी सारखा मऊ भाग असतो त्यामुळे मांजराच्या पायाचा आवाज होत नाही .

1 Comments
Nice
ReplyDeleteIf you Have Any Doubts, Let Me Know.