Viral Post

5/recent/ticker-posts

पाठ २४. थोर हुतात्मे | संपूर्ण प्रश्न उत्तर | इयत्ता ४ थी | मराठी बालभारती | स्वाध्याय

 पाठ २४. थोर हुतात्मे  
संपूर्ण प्रश्नोत्तरे
--------------------------

प्र.१ )  एका  वाक्यात उत्तरे लिहा :

१)  लाहोरच्या  तुरुंगातले तीन क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत होते ?
उत्तर :-  लाहोरच्या तुरुंगातले तीन  क्रांतिवीर   'इन्किलाब  झिंदाबाद'   अशा घोषणा देत होते.

२)  १९२८ साली लाहोरमध्ये  कोणाच्या विरोधात  निदर्शने  झाली  ?
उत्तर :-  १९२८ साली 'सायमन कमिशन'   च्या विरोधात निदर्शने झाली .

३)  भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयांत उच्च शिक्षण घेतले ?
उत्तर :-  भगतसिंगांनी  लाहोर येथील दयानंद अंग्लो- वेदिक महाविद्यालय  व   नॅशनल   कॉलेज येथे उच्च शिक्षण घेतले.

४)  ब्रिटीश  सरकारने  सुखदेव यांना  कशामुळे धमकावले  ?
उत्तर :-  किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे   ब्रिटीश सरकारने  सुखदेव यांना धमकावले .

५)  कोणाच्या मदतीने  सुखदेवांनी  'नौजवान  भारत सभा '  स्थापन केली  ?
उत्तर :-  कॉम्रेड  रामचंद्र ,   भगतसिंग  आणि   भगवतीचरण  व्होरा  यांच्या मदतीने  सुखदेवांनी   'नौजवान  भारत   सभा '  स्थापन केली .
--------------------------
प्र.२ )  गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द भरा:

१)  अलाहाबादच्या ------------- मध्ये  पोलिसांच्या चकमकीत  चंद्रशेखर   आझाद ठार  झाले.
(   आल्फ्रेड  पार्क /  स्कॉट पार्क )
उत्तर :-  आल्फ्रेड पार्क.

२)  भगतसिंग, राजगुरू आणि  सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोजपुर जवळ  ------------- नदीच्या काठी करण्यात आला.
(   गंगा /  सतलज )
उत्तर :-  सतलज.

३)  दिल्लीच्या '-------------' साप्ताहिकात  बळवंतसिंग या  नावाने भगतसिंग काम करू लागले.
(   प्रताप /  अर्जुन )
उत्तर :-  प्रताप.

४)  सुखदेव यांचा जन्म -------------तील चौरा बाजार येथे झाला.
(   लुधियाना /  बंग )
उत्तर :-   लुधियाना

५)  हुतात्मा राजगुरू यांच्या स्मरणार्थ 'खेड' या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर ------------- असे  करण्यात आले.
(   राजगुरूनगर /  कानपूर )
उत्तर :-  राजगुरुनगर.

--------------------------
प्र.३ ) योग्य जोड्या जुळवा :


उत्तर:-  १) राजगुरू -
                 २)   भगतसिंग -
                 ३)   सुखदेव -
                ४)   प्रताप वृत्तपत्र - 

Post Navi

Post a Comment

0 Comments