दैनंदिन जीवनात इंग्रजी बोलण्यासाठी उपयोगी वाक्ये.
Most important daily used sentence structures.
विद्यार्थी मित्रांनो,
आज मी तुम्हाला दररोज इंग्रजी बोलताना उपयोगी पडणारी आणि अतिशय महत्त्वाची अशी पाच प्रकारची वाक्ये कोणती ते सांगणार आहे . आपले दररोज चे बोलणे यांच्या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही याची मला खात्री आहे . चला तर मग पाहूया कोणती आहेत ही वाक्ये आणि कशी असते यांची रचना .........
1) Feel like...
2) Would like to....
3) had better ....
4) ought to.....
5) to be able to.....
-------------------------------------------------------------
🍎1) OUGHT TO : केले पाहिजे
Ought ची वाक्ये कोणत्या वेळी बोलावीत?
Ought to चा उपयोग आपण एखाद्या माणसाची नैतिक जबाबदारी काय आहे हे सांगण्यासाठी , एखाद्या माणसाचे सामाजिक कर्तव्य काय आहे हे सांगण्यासाठी , एखाद्या माणसाला सल्ला देण्यासाठी, एखाद्या गोष्टीची शक्यता व्यक्त करण्यासाठी आणि एखाद्या माणसाचे खरे कर्तव्य कोणते आहे हे इंग्रजीत सांगण्यासाठी ought to चा वापर करून वाक्ये बोलावीत.
Should आणि ought to ची वाक्ये एखाद्या माणसाने एखादे काम 'केले पाहिजे .....' असे सांगण्यासाठी वापरतात पण should पेक्षा ought to ला जास्त वजन आहे हे लक्षात ठेवा .
खालील वाक्ये पाहुया .......
1) तू परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे .
2) आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे .
3) तू वेळेवर औषधे घेतली पाहिजे .
4) तो वर्गात असला पाहिजे .
5) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजे .
-------------------------------------------------------------
Ought to चा वापर करून आपण चारही प्रकारची वाक्ये बोलू शकतो ..... कोणती ते खाली पहा ......
🍎साधे वाक्य
1) मी पिले पाहिजे ........I ought to drink ..........
2)आम्ही पिले पाहिजे ....We ought to drink .....
3)तू पिले पाहिजे ..........You ought to drink.....
4) तुम्ही पिले पाहिजे .....You ought to drink.....
5) त्याने पिले पाहिजे .....He ought to drink.....
6) तिने पिले पाहिजे ......She ought to drink....
7) ते ने पिले पाहिजे ......It ought to drink....... ..
8) त्यांनी पिले पाहिजे ...They ought to drink.......
-------------------------------------------------------
आपण खालील वाक्ये शांतपणे वाचली की आपल्या लगेच लक्षात येईल एवढी साधी वाक्ये आहेत ही.....
1) मी माझा गृहपाठ दररोज पूर्ण केला पाहिजे .
👉I ought to complete my homework everyday.
2) आपण आपली गाडी काळजीपूर्वक चालवली पाहिजे .
👉We ought to drive our car very carefully.
3) तू आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे .
👉You ought to look after your parents.
4)तुम्ही वाहन चालविताना परवाना सोबत ठेवला पाहिजे .
👉 You ought to carry your driving license.
5) त्याने सायकल रस्त्यावर डाव्या बाजूने चालवली पाहिजे.
👉 He ought to keep left while cycling on the road.
6) तिने रिकाम्या वेळात पुस्तके वाचली पाहिजे .
👉She ought to read useful books in off time.
7) त्यांनी उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा सरबत पिले पाहिजे.
👉 They ought to drink lemonade twice a day during summer.
8) आदित्यने दर रविवारी भरपूर खेळले पाहिजे .
👉 Aditya ought to play for a long time on Sundays.
9) श्रीमंत लोकांनी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे .
👉The rich ought to help needy and budding students.
10) आपण सैनिकांना आदराने वागवले पाहिजे .
👉 We ought to treat our soldiers respectfully.
11) तो पुण्यात असायला पाहिजे .
👉 He ought to be in Pune.
-------------------------------------------------------
🍎 प्रश्नार्थक वाक्ये
1) मी पिले पाहिजे का..........? Ought I to drink.........?
2) आम्ही पिले पाहिजे का.....? Ought we to drink....?
3) तू पिले पाहिजे का..........? Ought you to drink ....?
4) तुम्ही पिले पाहिजे का......? Ought you to drink ...?
5) त्याने पिले पाहिजे का.....? Ought he to drink.....?
6) तिने पिले पाहिजे का......? Ought she to drink... ..?
7) ते ने पिले पाहिजे का.......? Ought it to drink...... ?
8) त्यांनी पिले पाहिजे का.......? Ought they to drink... ?
-------------------------------------------------------
आता प्रश्नार्थक वाक्यांचा सराव करूया......
1)मी आज रात्री परतले पाहिजे का?
👉Ought I to return by tonight?
2) तिने शाळेतील सर्व उपक्रमात भाग घेतला पाहिजे का ?
👉 Ought she to participate in all school activities?
3) नागरिकांनी घरीच थांबले पाहिजे का?
👉 Ought citizens to stay at home?
-------------------------------------------------------
🍎नकारात्मक वाक्ये
1) मी प्यायले नाही पाहिजे ............I ought not to drink......
2) आम्ही प्यायले नाही पाहिजे ......We ought not to drink..
3) तू प्यायले नाही पाहिजे ..........You ought not to drink........
4) तुम्ही प्यायले नाही पाहिजे ........You ought not to drink..........
5) त्याने प्यायले नाही पाहिजे ........He ought not to drink.........
6) तिने प्यायले नाही पाहिजे ........She ought not to drink............
7) ते ने प्यायले नाही पाहिजे ........It ought not to drink..........
8) त्यांनी प्यायले नाही पाहिजे ......They ought not to drink.........
---------------------------------------------------------------------
नकारात्मक वाक्यांचा सराव........
1) तू पैसै वाया नाही घातले पाहिजेत .
👉 You ought not to waste money.
2) विद्यार्थ्यांनी रस्तयावर कचरा नाही टाकला पाहिजे .
👉 Students ought not to chuk the litter on roads.
3) वाहनचालकांनी दारू पिऊन गाडी नाही चालवली पाहिजे .
👉 Drivers ought not to drink and drive.
---------------------------------------------------------------------
🍎 मी प्यायले नाही पाहिजे का .......? Ought I not to drink..........?
वाक्ये पाहुया ...
1) मी शीतपेये प्यायला नाही पाहिजे का?
👉 Ought I not to drink cold drinks?
2) मी तुला धोक्याचा इशारा दिला नाही पाहिजे का?
👉 Ought I not to sound a bell of warning for you?
3) त्याने पुस्तकांसाठी पैसे खर्च केले नाही पाहिजे का?
👉 Ought he not to spend money for books?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
🍎 2 ) FEEL LIKE : एखादी गोष्ट करावे असे वाटणे.
मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्या मनात वेगवेगळे विचार येत असतात. कधी आपल्याला फिरायला जावे असे वाटते तर कधी छान पैकी आराम करायची इच्छा होते . कधी आपल्याला गोड खावे वाटते तर कधी पोहायला जावे वाटते. कधी टी.व्ही. पहावा वाटतो तर कधी बाजारात फेरफटका मारावा वाटतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपला मूड बदलत राहतो.....!
वरील सर्व कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आपणाला इतरांना सांगायची गरज तर पडणारच ना.....मग कशाही मोडक्या तोडक्या भाषेत सांगत बसण्यापेक्षा चला शिकून घेऊया नेमकी वाक्यरचना......
अगोदर मराठीत बघा ....
1) मला पेढा खावासा वाटतोय.
2) तिला बागेत जावेसे वाटतेय.
3) त्याला झोका खेळावेसे वाटतेय.
4) मला झोपावेसे वाटतेय.
5) आदित्यला नाचावेसे वाटतेय.
-------------------------------------------------------
चला आपण एक क्रियापद वापरून वाक्यरचना पाहूया.......
1) मला खेळावेसे वाटते ..........I feel like playing......
2) आम्हाला खेळावेसे वाटते .....We feel like playing.....
3) तुला खेळावेसे वाटते .........You feel like playing.....
4) तुम्हाला खेळावेसे वाटते .......You feel like playing....
5) त्याला खेळावेसे वाटते ......He feels like playing.....
6) तिला खेळावेसे वाटते ......She feels like playing......
7) ते ला खेळावेसे वाटते .......It feels like playing......
8) त्यांना खेळावेसे वाटते .......They feel like playing....
-------------------------------------------------------
1) मला क्रिकेट खेळावेसे वाटतंय.
👉I feel like playing cricket.
2) मला केक खावेसे वाटतंय .
👉 I feel like eating a cake.
3) मला गाणे म्हणावेसे वाटतेय.
👉 I feel like singing a song.
4) मला रस्त्यावर नाचावेसे वाटतेय.
👉 I feel like dancing on the road.
5) त्याला इंग्लंडला जावेसे वाटतंय.
👉 He feels like going to England.
6) सविताला पुण्यात थांबावेसे वाटतेय.
👉 Savita feels like staying in Pune.
7) तुला चहा प्यावासा वाटतंय का?
👉 Do you feel like having tea?
8) तुला झोपून राहावेसे वाटतेय का ?
👉 Do you feel like sleeping?
9) त्यांना हे ठिकाण सोडून जावेसे वाटतंय का ?
👉 Do they feel like leaving this place?
10) तिला कविता लिहावेसे वाटतेय का ?
👉 Does she feel like composing poems?
11) आम्हाला दिवसा काम करावेसे वाटत नाही .
👉 We don't feel like working by day.
12) मला तुला भेटावेसे वाटत नाही .
👉 I don't feel like meeting you.
13) त्याला मासाहारी पदार्थ खावेसे वाटत नाही .
👉 He doesn't feel like eating non vegetarian food.
14) मला त्यांच्या सोबत बोलावेसे वाटत नाही .
👉 I don't feel like talking with them.
15) तुला कोठे रहावेसे वाटतंय?
👉 Where do you feel like living?
16) तुला काय खावेसे वाटतेय ?
👉 What do you feel like eating?
17) मला माझे जुने घर विकावेसे वाटतेय.
👉 I feel like selling my old house.
18) मला राजकारणात उडी मारावेसे वाटतेय.
👉 I feel like taking the plunge into politics.
वरील वाक्यांचे निरीक्षण केले तर आपल्या काय लक्षात येते? feel like नंतर क्रियापदाला ing लावा आणि बोला लागतील तेवढी वाक्ये.....
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
🍎 3 ) WOULD LIKE TO ( इच्छा आहे ....)
आपल्याला भरपूर वेळा आपल्या आईवडिलांना, नातेवाईक मंडळीना आणि मित्रांना सांगावेसे वाटते की आपल्या मनात काय इच्छा आहे ...... उदाहरणार्थ
1) माझी आईस्क्रीम खायची इच्छा आहे .
2) माझी फिरायला जायची इच्छा आहे .
3) मला खूप शिकून मोठा अधिकारी व्हायची इच्छा आहे .
4) माझी नवीन गाडी घ्यायची इच्छा आहे .
वरील वाक्यें इंग्रजी भाषेत बोलण्यासाठी would like चा कसा वापर करतात ते पाहू चला....
-----------------------------------------------------------------------------
1) माझी इच्छा आहे .........I would like to...... ..
2) आमची इच्छा आहे ......We would like to.....
3) तुझी इच्छा आहे .........You would like to......
4) तुमची इच्छा आहे ......You would like to........
5) त्याची इच्छा आहे .......He would like to.........
6) तिची इच्छा आहे ........She would like to.......
7) तेची इच्छा आहे ..........It would like to......... ...
8) त्यांची इच्छा आहे .......They would like to.......
-----------------------------------------------------------------------------
आता आपली काय काय इच्छा आहे ते आपण सहजपणे सांगू शकतो . वरील वाक्यांमध्ये to नंतर जे क्रियापद आपण लिहिले ती आपली इच्छा लोकांना समजलीच म्हणून समजा........
चला वाक्ये पाहुया......
1) माझी चहा घ्ययची इच्छा आहे .
👉 I would like to take tea.
2) माझी केक खायची इच्छा आहे .
👉 I would like to eat a cake.
3) माझी अमेरिकेला भेट द्यायची इच्छा आहे .
👉 I would like to visit the U. S. A.
4) आमची नदीत पोहायची इच्छा आहे .
👉 We would like to swim in the river.
5) विराटची विश्वकरंडक जिंकायची इच्छा आहे .
👉 Virat would like to win the Word Cup.
6) सविताची गायिका व्हायची इच्छा आहे .
👉 Savita would like to become a singer.
7) माझ्या आईची इंग्रजी शिकायची इच्छा आहे .
👉 My mother would like to learn English.
8) त्यांची गाणे ऐकायची इच्छा आहे .
👉 They would like to listen music.
-----------------------------------------------------------------------------
आपण समोरच्या माणसाला त्याची इच्छा विचारू शकतो ....
1) तुझी बिस्किटे खायची इच्छा आहे का?
👉 Would you like to eat biscuits?
2) त्याची घर विकायची इच्छा आहे का ?
👉 Would he like to sell his house?
3) तिची मला भेटायची इच्छा आहे का ?
👉 Would she like to meet me?
-----------------------------------------------------------------------------
आपण आपली काय इच्छा नाही ते पण सांगू शकतो .......
1) माझी तुझ्यासोबत रहायची इच्छा नाही .
👉 I would not like to live with you.
2) माझी पैसे खर्च करायची इच्छा नाही .
👉 I would not like to spend money.
3) आदित्यची सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची इच्छा नाही
👉 Aditya would not like to participate in gathering.
-----------------------------------------------------------------------------
आपण समोरच्या माणसाला त्याची काय इच्छा नाही ते पण विचारू शकतो .....
1) तुझी कार चालवायची इच्छा नाही का ?
👉 Wouldn't you like to drive the car?
2) तुझी हे पुस्तक वाचायची इच्छा नाही का ?
👉 Wouldn't you like to read this book?
3) तुझी इथे थांबायची इच्छा नाही का ?
👉 Wouldn't you like to stay here?
😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈
🍎 4 ) HAD BETTER : अधिक बरे होईल .....
आपण काही वेळा समोरच्या व्यक्तीला सल्ला देतो . आपणाला काही वेळा लक्षात येते की आपले किंवा समोरच्या माणसाचे काहीतरी चुकतंय अशावेळी इशारा देण्यासाठी आपण आपले मत सांगतो .
Had better चा उपयोग करून आपण समोरच्या व्यक्तीने काय करायला पाहिजे किंवा त्याचे भले कशात आहे हे सांगता येते. येथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, had better नंतर लगेच क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे .
1) तू तुझी जुनी कार विकलेलं जास्त चांगले राहील .
2) तिने डाँक्टरचा सल्ला घेतलेला जास्त बरं राहील.
3) तू माझा सल्ला ऐकलेले जास्त चांगले राहील .
4) तू सध्या कोणतीही नोकरी पकडलेलं अधिक बरं राहील.
5) तुम्ही राजस्थानपेक्षा गोव्याला फिरायला गेलेले अधिक चांगले राहील .
---------------------------------------------------------------------
चला आपण इंग्रजी भाषेत पाहूया.
1)मी गेलेले अधिक चांगले राहील .........I had better go.....
2) आम्ही गेलेले अधिक चांगले राहील ...We had better go.......
3) तू गेलेले अधिक चांगले राहील .........You had better go .....
4) तुम्ही गेलेले अधिक चांगले राहील .....You had better go .......
5) त्याने गेलेले अधिक चांगले राहील .......He had better go ......
6) तिने गेलेले अधिक चांगले राहील .......She had better go .......
7) ते ने गेलेले अधिक चांगले राहील .........It had better go.......
8) त्यांनी गेलेले अधिक चांगले राहील .......They had better go......
-------------------------------------------------------
खालील वाक्ये वाचली की जमलेच म्हणून समजा......
1) तू येथून निघालेले अधिक चांगले राहील .
👉 You had better leave now.
2) तू माझे पैसे परत दिलेले अधिक चांगले राहील .
👉 You had better return my money.
3) तिने व्यायाम सुरू केलेले अधिक बरं राहील.
👉She had better start going to gym.
4) आदित्यने अधिक खाणे थांबवलेले जास्त चांगले राहील .
👉 Aditya had better stop over eating.
5) सध्याच्या काळात आपण घरीच थांबलेले जास्त चांगले राहील .
👉We had better stay at home nowadays.
6) लोकांनी पैशापेक्षा मुलांकडे लक्ष दिलेले जास्त चांगले राहील
👉 People had better care for children than money.
7) तू माझ्याशी संपर्क तोडलेले जास्त चांगले राहील .
👉 You had better lose touch with me.
8) पालकांनी मुलांचा फाजील लाड न केलेले जास्त चांगले राहील
👉Parents had better not pamper their kids.
9) तू मला शहाणपणा न शिकवलेले जास्त चांगले राहील .
👉 You had better not give me a lecture.
10) विलासने हे शेत न विकलेले अधिक चांगले राहील .
👉 Vilas had better not sell his farm.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.