Viral Post

5/recent/ticker-posts

Google Drive चा वापर

Google Drive चा वापर

गूगल ड्राईव्ह 



-------------------------------------------

प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये Google Drive इनबिल्ट च आहे. परंतु बरेच जण या गूगल सेवेचा वापर करत नाहीत. आज आपण Drive विषयी माहिती घेऊयात.

★ हे एक ऑनलाइन स्टोरेंज असून यात  15 gb पर्यंत डाटा सेव्ह करता येतो. ते ही पूर्णपणे मोफत.या पुढील स्टोरेज साठी रक्कम भरून अधिक स्टोरेज वाढवता येते.

★ या मध्ये आपल्याला सर्व प्रकारचे Documents,  PDF फाईल्स, GR, images, Video, Audio किंवा इतर महत्वपूर्ण माहिती upload करून कायम सेव्ह/जतन करता येते व त्याची लिंक इतरांना share करता येते.




ड्राईव्ह App कसे वापरावे?

प्रथम ड्राईव्ह ओपन करून आपला email व पासवर्ड इन्सर्ट करून sign इन करून घ्यावे लागेल.
आता फाईल्स अपलोड करण्यासाठी प्रथम ड्राईव्ह ओपन केल्यानंतर + या चिन्हावर टच करा व create फोल्डर वर टच करून आपण अपलोड करत असलेल्या विषय माहिती शी निगडित फोल्डर ला नाव द्या.

तयार केलेल्या फोल्डर मध्ये documents व इतर बाबी अपलोड करण्यासाठी पुन्हा + या चिन्हावर टच करा व upload वर टच करून मोबाईल स्टोरेज मधील हवी ती माहिती सिलेक्ट करा व upload करा. आपली माहिती अपलोड होईन ड्राईव्ह मध्ये सेव्ह होईल.

एकवेळ अपलोड केलेली  माहिती,documents मोबाईल मधून डिलिट केली/झाली तरी ड्राईव्ह वर कायम सेव्ह राहील. हव्या त्या वेळी डाऊनलोड करू शकता.


लिंक कशी द्यायची?

ड्राईव्ह मध्ये अपलोड केलेल्या ppt/pdf/video /audio  फाईलला डायरेक्ट लिंक कशी द्यायची हे आपण आता पाहणार आहे.

1)यासाठी प्रथम तुम्हाला drive मधील ज्या document/file ची लिंक द्यायची आहे , ती फाईल निवडा.

2)उजव्या बाजूला वर्तुळात i असलेल्या चिन्हावर टच करा.

3)टच केल्यावर जे पेज ओपन होते..त्या पेजच्या खाली  who has access च्या ठिकाणी लिंक बटणवर टच करा.ते हिरवे होईल तो पर्यंत wait करा.म्हणजेच public होईल म्हणजेच ही लिंक कोणालाही डाऊनलोड करण्यासाठी तयार होते.(इतरांना डाउनलोड साठी लिंक share करायची असेल तर ही प्रक्रिया महत्वपूर्ण आहे)*

4)त्यानंतर त्याच पेजवरील सर्वात वर share link बटणवर टच करा.

5) टच केल्यावर अनेक ऑप्शन येतील,त्यातील Copy to clipboard या ऑप्शन ला टच करा लिंक काॅपी होईल.
अशा प्रकारे लिंक तयार करून इतरांना share करता येईल.

-------------------------------------------------

डायरेक्ट डाऊनलोड लिंक कशी तयार करायची..?

एखादी लिंक ओपन केली तर फाइल ओपन होते व मग पुन्हा आपल्याला डाउनलोड चिन्हावर  टच करून फाइल डाउनलोड करून घ्यावी लागते. आणि जर लिंक टच करून डायरेक्ट डाउनलोड चालू झाले तर...?
त्या साठी direct लिंक द्यावी लागेल.

ड्राईव्ह मधील ppt/pdf/video /audio  फाईलला डायरेक्ट लिंक कशी द्यायची हे आपण आता पाहणार आहे.

1) वरील प्रमाणे ड्राईव्ह वरील फाइल ची लिंक copy करा.

2)Copy केलेली लिंक ही तुमची त्या डाक्युमेंटची महत्वाची  लिंक आहे. डायरेक्ट  लिंक बनवण्यासाठी कोणत्याही browser मध्ये खालील

https://sites.google.com/site/gdocs2direct/

हा वेब अड्रेस टाकून सर्च करा.

3)आता Direct link Generater असे पेज ओपन होईल.त्या पेजवरील enter your sharing url च्या  ठिकाणी गुगल ड्राईव्ह ची वरील  लिंक Copy  केलेली आहे, ती पेस्ट करा..

4)पेस्ट केल्यावर त्याच्या खाली create direct link बटणवर टच करा लगेच त्याच्या खालील चौकटीत  डायरेक्ट लिंक तयार होईल. .*

5)खाली  तयार झालेली लिंक शेअर करा. .. डाक्युमेंट डायरेक्ट डाऊनलोड चालू होईल.
टीप:- कोणत्याही फाइल ची direct लिंक होईल परंतू फोल्डर ची डायरेक्ट लिंक होणार नाही.
---------------------------------------------------

लिंक short कशी करायची?

वरील प्रकारे तयार केलेली लिंक खूप मोठी असेल,ती  टाईप करन्यास सोपी नसणार. मग ती लिंक शॉर्ट/लहान पण करता येते.
लिंक short करण्यासाठी दोन पर्याय आहेत.

1) browser वरून कोणत्याही browser मध्ये https://goo.gl हा अड्रेस टाका, Google Url Shortner नावाचे पेज ओपन होईल.
यात तुमची कॉपी केलेली लिंक टाका. व create short link वर टच करा ती छोटी  होईल...
तेथून copy करून  शेअर करा..
(वापरात असलेला browser ही आपल्या ई-मेल ने sign in केलेला हवा, नसेल तर करून घ्या.)

2)URL shortner Android App
App ओपन करा, ई-मेल ने sign in करून घ्या.
आपण ड्राईव्ह मधून कॉपी केलेली लिंक इथं इन्सर्ट करा.ok टच करा,क्षणार्धातच लिंक शॉर्ट होईल, इथून पुन्हा कॉपी करा व share करा.

हे app खालील लिंक वरून डाउनलोड करता येईल.

Browser किंवा app मध्ये शॉर्ट केलेल्या लिंक analysis करता येईल.म्हणजे किती लोकांनी लिंक ओपन केली, कोणत्या browser वरून , त्यांचं लोकेशन, इत्यादी माहिती लिंक विषयी माहिती पाहता येते.

किती सोप्प आहे ना ..!

मग लगेच आपल्याकडे असलेली  महत्वपूर्ण माहिती ड्राईव्ह वर अपलोड करून आपली private link create करून लिंक share करा.



Post Navi

Post a Comment

0 Comments