आपण सतत वाक्प्रचार,मराठी ववाक्प्रचारmarathi vakyaprachar,vakyaprachar,Marathi Vakyaprachar मराठी वाक्प्रचार अर्थासहित महत्वाचे मराठी वाक्प्रचार याविषयी शोधत असता आपण कांही महत्वाचे वाक्प्रचार व त्यावर विचारले जाणारे वेगवेगळे प्रश्न अभ्यासणार आहोत.
वाक्प्रचार कशाला म्हणतात? -
वाक्प्रचार हा असा शब्द समुह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषा परिणामकारक होते, भाषेला सौदर्य प्राप्त होते.
- संकटाला आमंत्रण देणे- संकट येईल अशी स्थिती निर्माण होणे..
- पोटापलीकडे पाहणे- सांस्कृतीक गरजा लक्षात घेणे.
- पाठीवर शाबासकी देणे- प्रोत्साहन देणे.
- कंबर कसणे- जिद्दीने सिद्ध होणे.
- शब्दांकित करणे- शब्दात व्यक्त करणे.
- फळ मिळणे- हेतू पूर्ण होणे.
- येरझारा घालणे- अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे
- हरी हरी करणे- झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा पुन्हा खंत व्यक्त करणे.
- शून्यातून विश्व उभारणे- प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे.
- मोहरून जाणे- मोहून जाणे, आकर्षिले जाणे.
- कानावर येणे- कोणाकडून तरी कळणे.
- कानात प्रण आणून ऐकणे- अत्यंत लक्षपूर्वक ऐकणे.
- बांध घालणे- मज्जाव करणे.
- खोडी काढणे- कुरापत काढणे, मस्करी करणे.
- गट्टी जमणे- मैत्री जमणे.
- तोंड वासून पडणे- अत्यंत निराशेने चेहरा निश्चल ठेवून पडून राहणे.
- कांहीतरी करून दाखवणे- चाकोरीबाहेरील एखादे नवीन कृत्य असे काम करणे.
- आकांताने प्रयत्न करणे- जिवाची पर्वा न करता प्रयत्न करणे.असाध्य असणे- मिळत नसणे, न लाभणे
- उणे नसणे- कमतरता नसणे.
- दुःख वारणे- दुःख दूर करणे.
- तहानभूक विसरणे- एखाद्या विषयात पूर्ण गढून जाणे.
- आपल्या मागे ठेवून जाणे- मृत्यूनंतर शिल्लक राहणे.
- भ्रमण करणे- सर्वत्र फिरणे.
- डोळ्याखालून घालणे- स्वतः तपासून पाहणे.
- समर्पित करणे- अर्पण करणे.
- चाहूल लागणे- सुगावा लागणे,कोणीतरी येत, असल्याचे जाणवणे
- अठराविश्वे दारिद्र्य असणे- आत्यांतिक दारिद्र्य असणे.
- खाईत पडणे- चितेवर पडणे, मृत्यूसारखी परिस्थिती निर्माण होणे.
- मनावर मळभ पसरणे- मन चिंतेने, निराशेने दुःखाने व्यापणे.
- उकल होणे- कोडे सुटणे, समजणे.
- आरोळी मारणे- मोठ्याने हाक मारणे.
- पोट भरणे- अन्न खाणे.
- आळा तुटणे- जीवन विस्कटणे
- हातावर हात ठेवून बसणे- काम असताना कोणतेही काम न करणे.
- पांग फेडणे- उपकार फेडणे, उतराई होणे.
- मनात काहूर उठणे – मनात विचारांचे, वादळ येणे.
- गहिवरून येणे – कंठ दाटून येणे.
- मती कुंठित होणे – विचार प्रक्रिया थांबणे.
- तरतरी पेरणे – उत्साह निर्माण करणे.
- तांबडं फुटणेः-पहाट होणे.
- थंडीने अंग काकडणेः- थंडीने अंग गारठणे.
- दिवस माथ्यावर येणेः- टळटळीत दुपार होणे.
- हबकून जाणेः- घाबरणे.
- मनात उलघाल होणेः- मनाची चलबीचल होणे, अस्वस्थ होणे.
- वाटेला लागणेः- मार्गाने जाणे.
- खुटून बसणेः- रूसून बसणे.
- नजर खिळणेः-नजर एका जागी स्थिर होणे.
- उलघडा न होणेः- न समजणे.
- हातभार लावणेः- मदत करणे.
- गाडी रूळावर येणेः-पूर्ण व्यवस्थित होणे.
- माघारी फिरणेः- परत फिरणे.
- मानेला झटका देणेः- नाराजी व्यक्त करणे.
- साद घालणेः- हाक मारणे.
- नजर लावणेः- एकटक पाहणे.
- साथ देणेः-सोबत असणे.
- आबाळ होणेः- नीट देखभाल न होणे.
- स्तुती करणेः- प्रशंसा करणे, कौतुक करणे.
- मान फिरवणेः- नाराजी व्यक्त करणे.
- तोंड उघडणेः- बोलायला सुरवात करणे.
- उभारी येणेः- उत्साह वाटणे, उमेद येणे.
- आडवे येणेः- बंधन घालणे, नकार देणे.
- आनंदाला पारावर न राहणेः- खूप आनंद होणे.
- डोळे पाण्याने भरणेः- रडू येणे, रडवेले होणे.
- विराजमान होणेः- आसणावर ऐटीत बसणे, स्थानापन्न होणे.
- मान डोलावणेः- संमती देणे, होकार देणे.
- प्रसार करणेः- सर्वांना माहिती देणे, प्रचार करणे.
- खिशाला परवडणेः- खर्च करण्याची ऐपत असणे.
- आभार मानणेः- धन्यवाद देणे.
- खलबते चालणेः- दीर्घकाळ चर्चा होणे, मसलत होणे.
- डावपेच आखणेः- आराखडा तयार करणे.
- लढा देणेः- संघर्ष करणे, झुंज देणे, संग्राम करणे.
- मनोमन ठरवणेः- स्वतःच्या मनाशी पक्के करणे.
- मन वळवणेः- एखाद्या गोष्टीसाठी मन तयार करणे.
- पर्वणी वाटणेः- भरपूर आनंददायी मनःस्थिती असणे.
- अनुमती दर्शवणेः- परवानगी असणे.
- टक्कर देणेः- सामना करणे, तोंड देणे.
- सल्ला देणेः- मार्गदर्शन करणे, उपदेश देणे.
- दाखल होणेः- प्रवेश घेणे.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.