💥 विरुद्धार्थी शब्द ( विरुद्ध
अर्थाचे शब्द )💥
मराठी भाषेत अनेक शब्दांना जसे
समानार्थी शब्द आहेत. तसेच त्या शब्दांचे विरुद्ध अर्थ व्यक्त करणारे शब्दही आहेत.
उदा.
चांगले × वाईट सुख × दुख
वर्तन × गैरवर्तन दुष्काळ × सुकाळ
* विरुद्धार्थी
शब्दांची वर्णानुक्रमे यादी :
अटक × सुटका
अमृत × विष
अलीकडे × पलीकडे
अवघड × सोपे
अंधार × उजेड
आकाश × पाताळ
आठवणे × विसरणे
आत × बाहेर
आनंद × दु:ख
आरंभ × शेवट, अखेर
आळशी × उद्योगी
इकडे × तिकडे
उगवणे × मावळणे
उघड × बंद , गुप्त
उच्च × नीच
उलट × सुलट
उपयोगी × निरुपयोगी
उष्ण × थंड, शीतल
उंच × बुटका
ऊन × सावली
एक × अनेक
ओढणे × ढकलणे
ओला × कोरडा, सुका
कडक × नरम
कडू × गोड
काळा × पांढरा, गोरा , शुभ्र
खरे × खोटे
खरेदी × विक्री
खाली × वर
खूप × थोडे
गरीब × श्रीमंत
गुरु × शिष्य
गोड × कडू
चढणे × उतरणे
चूक × बरोबर
छोटा × मोठा
जड × हलके
जन्म × मृत्यू
जमा × खर्च
जाणे × येणे
डावा × उजवा
तरुण × म्हातारा, वृद्ध
ताजे × शिळे
थंड × गरम
थांबणे × जाणे
दिवस × रात्र
दूर × जवळ
देश × विदेश
धीट × भित्रा
नफा × तोटा
नवीन × जुने
पक्का × कच्चा
पहिला × शेवटचा
पाप × पुण्य
प्रश्न × उत्तर
फिकट × गडद
भराभरा × हळूहळू
मऊ × टणक, कठीण, खरबरीत
मागे × पुढे
मित्र × शत्रू , वैरी
लवकर × उशिरा
लहान × मोठा
वर × खाली
सरळ × वाकडा
सांडणे × भरणे
सुरुवात × शेवट, अंत
सैल × घट्ट
सोपे × कठीण
स्वस्त × महाग
हसणे × रडणे
हार × जीत
हारणे × जिंकणे
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.