💥 शब्दसमूहाबद्दल एक शब्द 💥
पुढील वाक्ये लक्षपूर्वक वाचा :
१) अपेक्षित नसताना घडलेली गोष्ट - अनपेक्षित
२) अरण्याचा राजा - वनराज
३) वानरांचा राजा - वानरराज
४) आठ दिवसांचा काळ - आठवडा
५) आपल्या लहरी प्रमाणे वागणारा - स्वच्छंदी
६) आंब्यांच्या झाडांची बाग - आमराई
७) उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह - धबधबा
८) कथा लिहिणारा - कथाकार
९) कधीही नाश न पावणारे - अविनाशी
१०) कमी आयुष्य असलेला - अल्पायुषी
११) कविता करणारा - कवी
१२) कष्ट करून जगणारा - श्रमजीवी
१३) कार्यक्रम पाहणारा - प्रेक्षक
१४) किल्ल्याभोवतीची भिंत - तट
१५) खूप आयुष्य असलेला - दीर्घायुषी
१६) खूप दानधर्म करणारा - दानशूर
१७) खूप पाऊस पडणे - अतिवृष्टी
१८) गाणे गाणारा - गायक
१९) बसण्यासाठी केलेला ओटा - कट्टा
२०) घोडे बांधायची जागा - पागा, तबेला
२१) चार रस्ते एकत्र येतात ती जागा - चौक
२२) चित्रे काढणारा - चित्रकार
२३) जन्म झालेले ठिकाण - जन्मभूमी
२४) जादूचे खेळ करून दाखवणारा - जादुगार
२५) ज्याचा विसर पडणार नाही असा - अविस्मरणीय
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.