💥एकाच शब्दाचे भिन्न अर्थ💥
एकाच शब्दाचे दोन तीन वा अधिक अर्थ असणारे अनेक शब्द मराठी भाषेत आहेत .
उदा.,'बोट' या शब्दाचे 'हाताचे बोट' आणि 'छोटी नाव' असे दोन अर्थ होतात. अशा शब्दांचा वाक्याच्या संदर्भात अर्थ काढावा लागतो.
उदा., अजयचे बोट सुजले आहे .
माझी बोट पाण्यावर तरंगत आहे.
वरील दोन वाक्यातील 'बोट' या एकाच शब्दाचा अर्थ वाक्याप्रमाणे वेगळा-वेगळा आहे.
असे दोन दोन किंवा अधिक अर्थ सांगणारे शब्द व त्यांचे अर्थ पुढे दिलेले आहेत.
अनंत - अमर्यादित , परमेश्वर.
अंग - शरीर , बाजूने , कलाने.
आस - इच्छा , गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा.
ऋण - कर्ज , उपकार , वजाबाकीचे चिन्ह.
ओढा - पाण्याचा लहान प्रवाह , मनाचा कल.
कर्ण - कान , काटकोन त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू , महाभारतातील दानशूर योद्धा .
कर - हात , सरकारी सारा ( Tax )
कळ - वेदना , भांडणाचे कारण.
काळ - वेळ , यम , मृत्यू .
कोर - चंद्राची कोर , कोरण्याची क्रिया.
खोड - झाडाचा बुंधा , सवय.
गाणे - गीत , गाऊन दाखवणे .
जीवन - पाणी, आयुष्य .
झाड - वृक्ष , झाडू मारण्याची क्रिया.
डाव - कारस्थान , कपट , खेळी .
तट - किनारा , किल्याची भिंत , गट.
तळी - तळाला , तलाव .
तीर - बाण , नदीचा किनारा , पाण्यातील सूर .
दंड - हाताचा ( बाहू ) , शिक्षा , काठी .
धड - मानेखालचा शरीराचा भाग , अखंड , स्पष्टपणे .
ध्यान - समाधी , चिंतन , भोळसट , व्यक्ती.
नाद - आवाज , छंद .
नाव - होडी , वस्तूचे किंवा व्यक्तीचे नाव .
पर - पीस , पंख , परका.
पक्ष - राजकीय संघटना , वादातील दोन बाजू , पंधरवडा.
पाटी - लिहिण्याची , भाजी ठेवण्याची
पाठ - शरीराचा एक भाग , पाठांतर
पात्र - नदीच्या प्रवाहाची रुंदी , भांडे , योग्य , नाटकातील कलाकार .
पान - विड्याचे , जेवणाचे , झाडाचे , वही-पुस्तकाचे .
पार - पलीकडे , झाडाच्या भोवताली बांधलेला कट्टा .
पूर - नगर , पाण्याचा पूर .
भाव - भक्ती , किंमत , दर , भावना .
मान - सन्मान , मोठेपणा , शरीराचा एक भाग
माया - ममता , प्रेम , धन .
माळ - फुलांचा हार , ओसाड जागा .
लता - वेल, मुलीचे नाव .
वर - आशीर्वाद , लग्न ठरलेला पुरुष , वरची दिशा.
वाणी - उद्गार , व्यापारी .
वात - दिव्याची वात , वारा , शरीराचा विकार .
वारी - यात्रा , नियमित फेरी .
वाली - रक्षणकर्ता , पुराणकथेतील एका वानरराजाचे नाव .
विभूती - थोर व्यक्ती , अंगारा.
सर - शिक्षक , फटाक्यांचा सर , बाजूस सारणे .
साथ - रोगाची साथ , सोबत .
सुमन - फूल , पवित्र ( चांगले ) मन.
हार - पराभव , फुलांची माळ.
1 Comments
So nice
ReplyDeleteIf you Have Any Doubts, Let Me Know.