Quick Links
- NISHTHA ONLINE TRAINING संक्षिप्त माहिती
- NISHTHA ONLINE TRANING प्रशिक्षण नोंदणी कशी करावी?
- निष्ठा प्रशिक्षण घेतांना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक सूचना
- निष्ठा प्रशिक्षण मोड्यूलनिहाय वेळापत्रक
- निष्ठा अप्प वापरण्यासंबंधीचा Videos
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांमधील इ.1 ली ते इ. 8 वीसाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यासाठी ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता DIKSHA प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामध्ये खालील 18 मोड्युल्सचा समावेश असणार आहे.
- अभ्यासक्रम, अध्ययनार्थीकेंद्रित अध्यापनशास्त्र, अध्ययन निष्पत्ती आणि सर्व समावेशक शिक्षण.
- सुरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्यांचे विकसन.
- शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य
- अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील लैंगिक दृष्टिकोनाची उपयुक्तता
- माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकनातील एकात्मीकरण
- कला एकात्मिक अध्ययन
- शाळा आधारित मूल्यांकन
- पर्यावरण विषयक अभ्यासाचे अध्यापनशास्त्र (प्राथमिक स्तर)
- गणित अध्यापनशास्त्र
- सामाजिक शास्त्रातील अध्यापन पद्धती (उच्च प्राथमिक स्तर)
- भाषेचे अध्यापनशास्त्र
- विज्ञानाचे अध्यापनशास्त्र (उच्च प्राथमिक स्तर)
- शालेय नेतृत्व: संकल्पना व उपयोजन
- शालेय शिक्षणातील पुढाकार
- शाळापूर्व शिक्षण
- शाळेतील पूर्व व्यवसायिक शिक्षण
- covid-19 शालेय शिक्षणातील आव्हाने
- बालकांच्या हक्काबाबत Protection of Children from Sexual Offences POCSO Act 2012
NISHTHA ONLINE TRAINING संक्षिप्त माहिती
- एकूण १८ modules (03 Modules चे 06 courses असे एकूण 18 Modules आहेत)
- प्रत्येक १५ दिवसांसाठी ०३ modules
- प्रत्येक ०३ Module संपल्यानंतर Completion Certificate Registered ID वर मिळणार.
- सगळे MODULE संपल्यावर मुख्य प्रमाणपत्रासाठी हे सर्व Completion Certificate आवश्यक असणार आहेत.
- शेवटी एक चाचणी होणार आणि त्यानंतरच फायनल सर्टिफिकेट मिळणार.
- सध्या इंग्रजी/हिंदी मध्ये MODULES उपलब्ध आहेत.
- उर्दू माध्यमाचे मुख्याध्यापक व शिक्षक हिंदी भाषेत प्रशिक्षण पूर्ण करू शकतात.
NISHTHA ONLINE TRANING प्रशिक्षण नोंदणी कशी करावी?
- सर्वप्रथम प्ले स्टोर वरून दीक्षा ॲप डाऊनलोड करून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.
- त्यानंतर I AM A TEACHER असे निवडा.WITH MAHARASHTRA STATE असे निवडा व SUBMIT बटन वर क्लिक करा.
- त्यानंतर BORAD मध्ये STATE (MAHATASHTRA) असे निवडा
- माध्यम आपण ज्या माध्यमांसाठी शिकवता ते माध्यम निवडा.
- इयत्ता आपण शिकवत असलेल्या इयत्ता निवडा (आपण एकापेक्षा जास्त इयत्ता निवडू शकता)
- त्यानंतर पुढे हे बटन क्लिक करा
- याप्रमाणे आपण दीक्षा ॲप मध्ये प्रवेश कराल.
- स्क्रीन वरील उजव्या हातावर असलेले PROFILE ह्या वर क्लिक करा
- आपल्याला लॉगिन पेज वर रीडायरेक्ट केले जाईल.
- आपल्याकडे G Mail चा email id असल्यास Sign In with Google करा अथवा Register या वर क्लिक करा त्या नंतर आपण Register on DIKSHA ह्या पेज वर याल
- ह्यात सर्व प्रथम आपल्या जन्म तारखेचे वर्ष निवडा
- आपले पूर्ण नाव टाका
- प्राधान्याने G Mail id ने Register व्हा
- आपला पासवर्ड नव्याने तयार करा. (पासवर्ड लक्षात राहील असा तयार करावा)
- त्यानंतर व्हेरिफाय झाल्यावर आपण लॉगिन पेज वर याल
- लोगिन साठी आपला रजिस्टरड ईमेल आयडी व पासवर्ड टाका
- Profile संपादित करा ज्यात Board, माध्यम, इयत्ता, निवडा व जतन करा यावर क्लिक करा
- त्यानंतर आपल्या Unique DIKSHA ID तयार होईल.
- त्यानंतर तपशील सबमिट करा यावर क्लिक करा.
- ज्यात तुम्हाला
- MOBILE क्रमांक टाकायचा आहे आणि VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला Messages मध्ये OTP) प्राप्त होईल.
- ईमेल id VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला gmail मध्ये OTP) प्राप्त होईल.
- शाळा /संस्थेचे नाव, Udise No, ID (ज्यात तुम्ही SARAL ID/ SHALARTH ID किंवा दोन्ही उपलब्ध नसल्यास शाळेचा UDISE NO टाकू शकता)
- त्यानंतर सबमीट करा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
- याप्रमाणे ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षणासाठी आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल
NISHTHA प्रशिक्षण घेतांना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक सूचना
- यापूर्वी राज्यस्तर व तालुका स्तरावर झालेल्या निष्ठा प्रशिक्षणामध्ये उपस्थित व अनुपस्थित अशा सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सदर प्रशिक्षण यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
- शिक्षणामध्ये नव्याने दोन मॉड्युल्सचा समावेश आहे.
- प्रत्येक 15 दिवसासाठी तीन मॉड्युल्स याप्रमाणे एकूण 18 मॉड्युल्सचे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे. प्रत्येक मॉड्यूल पूर्ण केल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्यात येईल सर्व मोड्युल्स संपल्यानंतर अंतिम चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीस निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आठ दिवसांनी प्रदान करण्यात येईल.
- सदर प्रशिक्षण मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.सद्यस्थितीमध्ये मराठी भाषेतील शिक्षकांचे प्रशिक्षण यापूर्वी पूर्ण झाले असल्याने प्राधान्याने इंग्रजी व हिंदी भाषेतील प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उर्दू माध्यमाचे शिक्षक व मुख्याध्यापक हिंदी व इंग्रजी भाषेतील प्रशिक्षण पूर्ण करू शकतात.
- दीक्षा वर दर पंधरा दिवसांनी एकूण तीन मॉडेल्स नियोजनानुसार उपलब्ध करून दिले जाणार आहे. तरी ह्या पद्धतीच्या कालावधी मध्येच सदरचे तीन मॉडेल चे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- शिक्षक आपल्या पसंतीनुसार एक वेळी एक किंवा एकापेक्षा जास्त मोड्युल्सचे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतो. एका मोड्युलचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी सरासरी पाच दिवसांचा कालावधी गृहीत धरून सदर 15 दिवसाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर सदर कालावधी मधील कोर्स पुन्हा पाहता येणार नाही. प्रत्येक मोड्युलचा एक कोर्स याप्रमाणे एकूण सहा कोर्सेस प्रशिक्षणार्थींना पूर्ण करावे लागतील.
- या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी दि.24 ते 27 नोव्हेंबर 2020 आहे.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.