Viral Post

5/recent/ticker-posts

माझा आवडता प्राणी कुत्रा | मराठी निबंध लेखन

 

कुत्रा - माझा आवडता प्राणी





              कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. कुत्र्या इतका इमानदार कुठलाच प्राणी नाही. कुत्रा नेहमी आपल्या मालकाचे रक्षण करतो तसेच कोणी अनोळखी माणूस आपल्या घरा जवळ आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो. म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पळतात.

मला पण कुत्रे फार आवडतात माल कुत्र्यांविषयी फार माहिती आहे, आणि मी सुद्धा एक कुत्रा पळला आहे. माझ्या कुत्र्याचे नाव "बॉक्सर" आहे, तो लब्राडॉग ह्या जातीचा कुत्रा आहे. बॉक्सर दिसायला खूप सुंदर दिसतो पण तो तितकाच घातक पण आहे. समोर बॉक्सर दिसला कि कोणीही अनोळखी माणूस त्याच्या समोर येण्याची हिंमत करत नाही, त्याला बघून सर्वजण घाबरतात.

माझा कुत्रा बॉक्सर माझ्या कडे अगदी तो लहान होता तेव्हा पासून आहे. मला कुत्रे फार आवडतात म्हणून माझ्या बाबांनी माझ्या वाढदिवसाला मला हा कुत्रा भेट म्हणून दिला होता. आता पर्यंत हि माझी सर्वात आवडती भेटवस्तू आहे. बॉक्सरला आता सात वर्ष झाली आहेत आणि तो एक केवळ प्राणी नसून तो आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.

बॉक्सर सर्वांचाच लढका आहे त्याची आणि माझी फार चांगली मैत्री आहे, जे मी सांगेन तो ते ऐकतो. त्याला बस सांगितले कि बसतो आणि उठ सांगितले कि उठतो. त्यला जर मी बॉक्सर "गो" म्हणालो आणि इशारा दिला कि समोरच्याचे काही खरे नाही, तो इशारा मिळताच भुंकत धावून जातो. आणि मी सांगितले कि एका आवाजात तो शांत होतो.

बॉक्सरला सांगितले शेक ह्यांड कि तो लगेच बसतो आणि आपला एक हात वर करतो आणि समोरच्या व्यक्तीच्या हातात हात देतो आणि त्याची जीभ बाहेर काढतो. माझा कुत्रा बॉक्सर हा खूपच प्रेमळ कुत्रा आहे तो माझ्यावर खूप प्रेम करतो. त्याचे केस खूप सुंदर आहेत आणि मोठे सुद्धा मी त्याला दर दोन आठवड्याने आंघोळ घालतो.

बॉक्सर खूप हुशार आहे त्याचे कान नेहमी उभे असतात कोणी अनओळखी आले कि तो लगेच भुंकून इशारा देतो त्याचे नाकाची गोष्टच वेगली आहे कुठलीही वस्तू त्याला लगेच वास घेऊन कळते. क्रिकेट खेळताना तो लगेच बोल शोधून आनतो. कधी घराच्या बाहेर गेले आणि उशिरा घरी येतात तोपर्यंत बॉक्सर आमची वाट बघत राहतो. 

असा हा कुत्रा फारच हुशार असतो तो एक अत्यंत प्रेमळ आणि इमानदार प्राणी आहे त्याच्या कडे कुठली हि वस्तू वास घेऊन शोधण्याची शमता आहे म्हणून आर्मी आणि पोलीस कुत्रा पाळतात कुत्र्याच्या ह्याच गुणांमुळे कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे.

Post Navi

Post a Comment

0 Comments