1 | अगं अगं म्हशी मला कोठे नेशी | स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. |
2 | आपला हात जगन्नाथ | आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. |
3 | अति तेथे माती | कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. |
4 | आयत्या बिळात नागोबा | दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. |
5 | आईजीच्या जीवावर बाईजी उदार | दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. |
6 | आपल्याच पोळीवर तूप ओढणे | फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे. |
7 | आंधळे दळते कुत्रं पीठ खाते | एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा. |
8 | आधी पोटोबा मग विठ्ठोबा | आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. |
9 | अडला हरी गाढवाचे पाय धरी | एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. |
10 | आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे | अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. |
11 | अति शहाणा त्याचा बैल रिकामा | जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही. |
12 | आधी शिदोरी मग जेजूरी | आधी भोजन मग देवपूजा |
13 | असतील शिते तर जमतील भुते | एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. |
14 | आचार भ्रष्टी सदा कष्टी | ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो. |
15 | आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली | अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. |
16 | आईचा काळ बायकोचा मवाळ | आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा |
17 | आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास | मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. |
18 | आपलेच दात आपलेच ओठ | आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे. |
19 | अंथरूण पाहून पाय पसरावे | आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. |
20 | आवळा देऊन कोहळा काढणे | क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. |
21 | आलीया भोगाशी असावे सादर | कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. |
22 | अचाट खाणे मसणात जाणे | खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो. |
23 | आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते | अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. |
24 | आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला | ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे. |
25 | आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं | स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. |
26 | अळी मिळी गुप चिळी | रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. |
27 | अहो रूपम अहो ध्वनी | एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे. |
28 | इच्छा तेथे मार्ग | एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच. |
29 | इकडे आड तिकडे विहीर | दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे. |
30 | उठता लाथ बसता बुकी | प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. |
31 | उडत्या पाखरची पिसे मोजणे | अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे. |
32 | उधारीचे पोते सव्वाहात रिते | उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो. |
33 | उंदराला मांजर साक्ष | वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे. |
34 | उचलली जीभ लावली टाळ्याला | विचार न करता बोलणे. |
35 | उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग | प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे. |
36 | उथळ पाण्याला खळखळाट फार | थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो. |
37 | उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये | कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. |
38 | एक ना घड भारभर चिंध्या | एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था. |
39 | एका माळेचे मणी | सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. |
40 | एका हाताने टाळी वाजत नाही | दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे. |
41 | ऐकावे जनाचे करावे मनाचे | लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. |
42 | एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत | दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. |
43 | ओळखीचा चोर जीवे न सोडी | ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. |
44 | कर नाही त्याला डर कशाला | ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे |
45 | कामापुरता मामा ताकापुरती आजी | आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. |
46 | काळ आला होता. पण वेळ आली नव्हती | नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. |
47 | कानामगून आली आणि तिखट झाली | मागून येऊन वरचढ होणे. |
48 | करावे तसे भरावे | जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते. |
49 | कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी | कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे. |
50 | कुर्हाडीचा दांडा गोतास काळ | आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो. |
51 | काठी मारल्याने पानी दुभंगत नाही – | रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही. |
52 | कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच | किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही. |
53 | कुडी तशी पुडी | देहाप्रमाणे आहार असतो. |
54 | कधी तुपाशी तर कधी उपाशी | संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते. |
55 | कावळा बसायला अन फांदी तुटायला | परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे. |
56 | कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच | कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही. |
57 | कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे | रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे. |
58 | कोल्हा काकडीला राजी | क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात. |
59 | कोरड्याबरोबर ओले ही जळते | निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे |
60 | कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही | निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. |
61 | काखेत कळसा नि गावाला वळसा | हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. |
62 | कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही | क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते. |
63 | खाण तशी माती | आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे. |
64 | खर्याला मरण नाही | खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते! |
65 | खाऊ जाणे ते पचवू जाणे | एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. |
66 | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी | परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा. |
67 | खाऊन माजवे टाकून माजू नये | पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये. |
68 | खोट्याच्या कपाळी गोटा | वाईट कृत्य करणार्याला माणसाचे शेवटी वाईटच होते. |
69 | गरजवंताला अक्कल नसते | गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते. |
70 | गर्वाचे घर खाली | गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच. |
71 | गरज सरो नि वैध मरो | आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे. |
72 | गर्जेल तो पडेल काय | केवळ गाजावाजा करणार्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते. |
73 | गाढवाला गुळाची चव काय? | मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. |
74 | गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ | मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार |
75 | गाव करी ते राव ना करी | श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात. |
76 | गाड्याबरोबर नळ्याची यात्रा | मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो. |
77 | गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता | मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो. |
78 | गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली | एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे. |
79 | गाढवाच्या पाठीवर गोणी | एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा. |
80 | गुरुची विद्या गुरूला फळली | एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. |
81 | गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य | ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे. |
82 | गोगलगाय नि पोटात पाय | एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. |
83 | गोरागोमटा कपाळ करंटा | दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती. |
84 | घर ना दार देवळी बिर्हाड | बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती. |
85 | घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात | एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात. |
86 | घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे | स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्यांने आपलेही काम लादणे. |
87 | घर पहावे बांधून लग्न पहावे करून | अनुभवाने माणूस शहाणा होतो. |
88 | घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते | आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात. |
89 | घरोघरी मातीच्याच चुली | सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे. |
90 | घोडे खाई भाडे | धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त. |
91 | चढेल तो पडेल | गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. |
92 | चालत्या गाडीला खीळ | व्यवस्थीत चालणार्या कार्यात अडचण निर्माण होणे. |
93 | चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही | लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत. |
94 | चिंती परा येई घरा | दुसर्याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते. |
95 | चोर सोडून सान्याशाला फाशी | खर्या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्याच निरपराध माणसाला शिक्षा देणे. |
96 | चोराच्या उलटया बोंबा | स्वत:च गुन्हा करून दुसर्यावर आळ घेणे. |
97 | चोराच्या मनात चांदणे | वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. |
98 | चोरावर मोर | एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्यावर कडी करणे. |
99 | जळत्या घराचा पोळता वासा | प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे. |
100 | जलात राहुन माशांशी वैर करू नये | ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये. |
101 | जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला | निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते. |
102 | जळत घर भाड्याने कोण घेणार | नुकसान करणार्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार. |
103 | जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे | दुसर्याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते. |
104 | ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी | एकमेंकाचे वर्म माहीत असणार्या माणसांशी गाठ पडणे. |
105 | ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट | जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत. |
106 | जशी देणावळ तशी धुणावळ | मिळणार्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. |
107 | ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे | एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो. |
108 | जी खोड बाळ ती जन्मकळा | लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात. |
109 | ज्याच्या हाती ससा तो पारधी | ज्याला यश मिळाले तो कर्तबगार |
110 | जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही | मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही. |
111 | जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी | मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते. |
112 | झाकली मूठ सव्वा लाखाची | व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते. |
113 | टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही | कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. |
114 | टिटवी देखील समुद्र आटविते | सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो. |
115 | डोळ्यात केर आणि कानात फुंकर | रोग एक आणि उपचार दुसराच |
116 | डोंगर पोखरून उंदीर काढणे | प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे. |
117 | तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला | भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे. |
118 | तळे राखील तो पाणी चाखील | आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. |
119 | ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला | वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो. |
120 | ताकापुरते रामायण | आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे |
121 | तोंड दाबून बुक्यांचा मार | एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे. |
122 | तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले | फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. |
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.