नाम
आपल्या अवतीभोवती , निसर्गात असंख्य वस्तू आहेत . त्यातील काही सजीव आहेत , काही निर्जीव आहेत . या सर्व वस्तूंना , पशुपक्ष्यांना , वनस्पतींना , मनातील भावनांना , दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या सर्व गोष्टीना नावे दिली आहेत :
प्रत्यक्षात असणार्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात.
उदा.
नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.
उदा.
सामान्य नाम | विशेषनाम |
पर्वत | हिमालय, सहयाद्री, सातपुडा |
मुलगा | स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरव |
मुलगी | मधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनी |
शहर | नगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर |
नदी | गंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी |
उदा.
उदा. या गावात बरेच नारद आहेत.
उदा.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)
सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात ती खालीलप्रमाणे –
शब्द | प्रत्यय | भाववाचक नाम | इतर उदाहरणे |
नवल | आई | नवलाई | खोदाई, चपडाई, दांडगाई, धुलाई |
श्रीमंत | ई | श्रीमंती | गरीबी, गोडी, लबाडी, वकिली |
पाटील | की | पाटीलकी | आपुलकी, भिक्षुकी |
गुलाम | गिरी | गुलामगिरी | फसवेगिरी, लुच्चेगिरी |
शांत | ता | शांतता | क्रूरता, नम्रता, समता |
मनुष्य | त्व | मनुष्यत्व | प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व |
शहाणा | पण, पणा | शहाणपण, पणा | देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण |
सुंदर | य | सौदर्य | गांभीर्य, धैर्य, माधुर्य, शौर्य |
गोड | वा | गोडवा | ओलावा, गारवा |
नामाचे कार्य करणारे इतर शब्द :
अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-
नियम –
1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.
उदा.
वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.
2. केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.
उदा.
वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.
3. केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.
उदा.
वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.
4. विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.
उदा.
विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.
5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.
उदा.
वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.
6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.
उदा.
वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.
7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.
उदा.
वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.