आपला राष्ट्रध्वज
तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे.
त्यात तीन पट्टे आहेत.
वरचा पट्टा केशरी रंगाचा आहे.
मधला पांढऱ्या रंगाचा आहे.
तिसरा हिरव्या रंगाचा आहे.
मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे.
तिरंगा भारताचे मानचिन्ह आहे.
तो रस्त्यावर टाकू नये.
तो फाडू नये.
तो खराब करू नये.
आपण राष्ट्रध्वजाचा अपमान केला, तर आपल्या देशाचा अपमान होईल.
म्हणून आपण त्याचा मान राखला पाहिजे..
Tags:
मराठी निबंध
