स्वातंत्र्यदिन
१५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन आहे.
आम्ही स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करतो.
आम्ही गणवेश घालून शाळेत जातो. झेंडावंदन करतो.
प्रमुख पाहुणे स्वातंत्र्यवीरांच्या गोष्टी सांगतात.
त्या आम्हांला खूप आवडतात.
स्वातंत्र्यदिनी सगळेजण घरावर झेंडा लावतात.
छातीवर बिल्ले लावतात.
सगळीकडे देशभक्तीचे कार्यक्रम होतात.
सगळेजण अभिमानाने स्वातंत्र्यदिन साजरा करतात.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.