PPT कशी बनवावी ?
------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रहो. आज आपण पाहणार आहोत संगणकावर PPT कशी बनवावी ?
ppt बनवण्यासाठी संगणक किंवा Laptop आपल्याकडे असणे आवश्यक आहेच सोबत आवश्यक आहे Ms Powerpoint हे टूल.
चला तर मग सुरु करूया !!
१) प्रथम MS Office मध्ये जाऊन Powerpoint ओपन करून घ्या.
२) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल . स्लाईड डिझाईन ची हवी असल्यास स्क्रीनवर डिझाईन या पर्यायावर क्लिक करा. विविध प्रकारच्या डिझाईन आपणास उपलब्ध होतील त्यापैकी एक डिझाईन निवडा.
३) स्लाईड वर आपणास दोन Text Box दिसतील . त्यापैकी वरच्या मोठ्या Text Box मध्ये आपल्या स्लाईड चा विषय आणि खालच्या लहान Text Box मध्ये आपले स्वताचे नाव लिहा.
४) Box नको असल्यास त्याच्या रेषेवर राईट क्लिक करून तो डिलीट करू शकता.
५) आता तुम्हाला स्लाईडवर एखादा आवडीचा फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यावर आपल्याला picture option दिसेल त्यावर
क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली
insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल.
६) फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word
art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box माउस च्या सहाय्याने लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा .
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता.
८) आता आपण 'Animation' कसे देतात ते पाहू.
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट
करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom
animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा. आता उजव्या बाजुला add effect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल
त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील
त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed
यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट करा.
अशा प्रकारे प्रत्येक
टेक्स्टला 'Animation' द्या.
अशा प्रकारे अनेक स्लाईड तयार करा.
९) यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ.
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर
अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा
(जवळपास 60 आहेत)त्याच्याच
शेजारी Transition sound व speed असे
दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे ते transition
निवडा त्याखालीच Apply to all असे option
दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल.
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल.
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.