कसोट्या
2,3,4,5,9,10,11,12
2 ची कसोटी
कोणत्याही सम
संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720
3 ची कसोटी
जर दिलेल्या
संख्येतील सर्व अंकांच्या एक अंकी बेरजेस 3 ने
पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येसदेखील 3 ने पूर्ण भाग जातो.
उदा. 27720
27720 या संख्येतील अंकांची बेरीज = 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18
18 या संख्येतील अंकांची बेरीज = 1 + 8 = 9
9 ला 3 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला देखील 3 ने पूर्ण भाग जातो.
4 ची कसोटी
जर दिलेल्या
संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला
4 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे दोन्ही अंक 0 असतील,
तर दिलेल्या संख्येसदेखील 4 ने पूर्ण भाग जातो.
उदा. 27720
27720 या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणारी संख्या 20.
20 या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो.
म्हणून 27720 ला देखील 4 ने पूर्ण भाग जातो.
गंमत म्हणून दुसरे
उदाहरण घेऊ - 12345678900.
ही संख्या एका दमात कदाचित वाचताही येणार नाही. परंतु शेवटच्या दोन अंकांकडे
पाहून या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो
असे सांगू शकतो.
5 ची कसोटी
जर दिलेल्या
संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल,
तर दिलेल्या संख्येस 5 ने पूर्ण भाग जातो.
उदा. 27720.
6 ची कसोटी
जर दिलेल्या
संख्येस 2 व 3 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या
संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
ही संख्या सम
असल्याने तिला 2 ने पूर्ण भाग जातो.
तिच्या अंकांच्या बेरजेला म्हणजे 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18 ला 3 ने पूर्ण भाग जात
असल्यामुळे 27720 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो.
म्हणजेच या संख्येस 2 व 3 या दोन्ही संख्यांनी भाग जातो,
म्हणून त्या संख्येस 6 ने ही पूर्ण भाग जातो.
7 ची कसोटी
दिलेल्या संख्येतील
एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी.
ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. तयार झालेल्या संख्येस 7 ने पूर्ण भाग जात
असल्यास दिलेल्या संख्येसदेखील 7 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
या संख्येच्या एककस्थानी 0 असल्याने तो सोडून देऊ.
उर्वरित संख्येचा म्हणजे 2772 चा विचार करु.
2772 च्या एककस्थानचा अंक 2. त्याची दुप्पट 4. ती 277 मधून वजा करु.
277 - 4 =
273.
273 साठी पुन्हा हीच कसोटी वापरु.
273 च्या एककस्थानचा अंक 3. त्याची दुप्पट 6. ती 27 मधून वजा करु.
27 - 6 =
21.
21 ला 7 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 27720 ला देखील 7 ने पूर्ण भाग जातो.
8 ची कसोटी
दिलेल्या संख्येतील
शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस 8 ने पूर्ण भाग
जात असेल किंवा शेवटचे तीन अंक 0 असतील, तर, दिलेल्या संख्येसदेखील 8 ने पूर्ण
भाग जातो.
उदा. 27720.
यात 27720 या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणारी संख्या 720.
720 ला 8 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला 8 ने पूर्ण भाग जातो.
9 ची कसोटी
दिलेल्या संख्येतील
अंकांच्या एक अंकी बेरजेस 9 ने पूर्ण भाग जात असेल तर, दिलेल्या
संख्येसदेखील 9ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
27720 : 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18, 18 : 1 + 8 = 9.
ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईलच असे नाही,
मात्र, ज्या संख्येला9 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 3 ने निश्चित भाग
जातो.
10 ची कसोटी
एककस्थानी 0 असलेल्या सर्व
संख्यांना 10 ने पूर्ण भाग जातो.
उदा. 27720
11 ची कसोटी
संख्येतील एकाआड एक
स्थानांवरील संख्यांच्या बेरजेतील फरकाला 11 ने पूर्ण भाग
जात असेल किंवा तो फरक 0 असेल तर अशा संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो.
उदा. 27720.
2
7
7
2
0
एकाआड एक
स्थानांवरील संख्या -
पहिला गट : 2, 7, 0
दुसरा गट : 7, 2 बेरजा 9,
9
फरक 0.
12 ची कसोटी
ज्या संख्येला 3 व 4 या दोन संख्यांनी
पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 12 ने ही पूर्ण भाग
जातो.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.