स्वाध्याय-माहेर/पाचवी -मराठी
स्वाध्याय माहेर-या कवितेचे कवी सदाशिव माळी आहेत. या कवितेत कवीने माहेरवाशिणी च्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. एखादी वस्तू बघून तिला कशाप्रकारे माहेराची आठवण येते हे रंजकतेने स्पष्ट केले आहे.
माहेर-पाचवी मराठी |Class-5th-Marathi |Maher |
स्वाध्याय माहेर-
--------------------------------------------------------
--------------------------------------------------------
प्रश्न-1 एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे ?
उत्तर- कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे.
आ) या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता ?
उत्तर- या नदीकाठी चिकणमाती आहे.
इ) कवितेतील स्त्री सुजीचे लाडू कशात बांधणार आहे ?
उत्तर- कवितेतील स्त्री सोजीचे लाडू केल्यात बांधणार आहे.
ई ) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे ?
उत्तर- कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे.
---------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------
प्रश्न-२ काय ते लिहा.
अ) गोठा बांधण्यासाठी उपयुक्त माती—–
आ) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ—–
इ) बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन—–
उत्तर-अ ) चिकन माती आ) सोजी इ) रथ
प्रश्न-३ चिकन माती बघून कवितेतील माहेरवाशीणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा.
उत्तर- तापी नदीच्या किनार्यावरील चिकन माती बघून माहेरवाशिणीला तिथे ओठा बांधावासा वाटतो. बांधून झाल्यावर त्यावर जातं मांडावे वाटते. त्या जात्यावर सोजी दळावीशी वाटते. या पीठाचे लाडू तयार करून ते सेल्यात बांधावे असे वाटतात. हा शेला घेऊन भाऊराया भेटेल. तो दारात रथ आणेल.त्या रथाला नंदी जुंपलेला असेल व हा रथ आपल्याला माहेरी घेऊन जाईल.माहेरी आपल्याला दंगामस्ती करायला मिळेल असे माहेरवाशिणीला वाटते.
व्याकरण सर्वनाम
वाक्यातील नामा-बद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.
खालील वाक्य वाचा व लिहा.
1. रोहित चांगला मुलगा आहे. तो नियमित अभ्यास करतो.
2. बाळ खेळत होता. त्याला आईने उचलून घेतले.
3. पुस्तकात धडे होते. ते आनंदाने वाचले.
सर्व नामामुळे नामाचा पुन्हापुन्हा उच्चार करण्याची आवश्यकता भासत नाही. नामा ऐवजी काही ठराविक शब्दांचा वापर भाषेमध्ये करण्यात येतो.
मी ,आम्ही, तू, तुम्ही,तो ,ती ,हा, ही ,हे ,जो, जी ,कोण ,काम ,आपण, स्वतः, तिने ,तिला ,त्यांना , त्यांनी, ज्यांना, ही ,मुख्य सर्वनामे आहेत.
वेगवेगळ्या वाक्यात यापैकी वेगवेगळे रूपे वापरले जातात.
-----------------------------------------------
-----------------------------------------------
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.