स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा
प्रश्न १ . रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१.पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थानहोते.
२.मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती .
३.शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती.
४.प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढत जाणारी शिवरायांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे
५.राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता .
प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा.
१.रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले?
उत्तर -रायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सहकाऱ्यांना शेवटी निश्चयाने बोलले की," हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे .श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करू या . "
२.जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला?
उत्तर -' आपण मनी जे धरले , ते शिवबा पूर्ण करणार ,' असा जिजाबाईंना विश्वास वाटू लागला.
३.शिवरायांनी कोणत्या गोष्टीची खडान् खडा माहिती मिळवली ?
उत्तर - शिवरायांनी चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारूगोळा,हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडान् खडा माहिती मिळवली .
४.शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले?
उत्तर - शिवरायांनी मावळांतील आपापसात होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे ठरवले .
५.शिवरायांनी आपला कारभार कशासाठी सुरू केला?
उत्तर - शिवरायांनी लोककल्याणासाठी आपला कारभार सुरू केला .
६.शिवरायांनी स्वराज्याबरोबर आणखी कशाला महत्त्व दिले?
उत्तर - शिवरायांनी स्वराज्याबरोबर स्वभाषा आणि स्वधर्माला महत्त्व दिले .
७.मावळ खोऱ्यातील मराठे शिवरायांना धन्यवाद का देऊ लागले ?
उत्तर - शिवरायांनी मावळ खोऱ्यातील मराठयांचे आपापसात होणारे झगडे थांबवल्याने मावळ खोऱ्यातील मराठे त्यांना धन्यवाद देऊ लागले .
१.शिवरायांचे कोणते ध्येय होते?
उत्तर - सर्वांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करायचे . यापुढे परक्यांची गुलामी करायची नाही . हिंदवी स्वराज्यस्थापनेसाठी सर्वांनी झटायचे आणि त्यासाठी सर्वांनी प्राणही अर्पण करायचे, हे शिवरायांचे ध्येय होते .
२.शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला?
उत्तर - स्वराज्यस्थापनेच्या मार्गाला लागल्यावर शिवराय मावळ्यांना घेऊन नियमितपणे तलवारीचे हात करू लागले . घोडदौड करणे , डोंगरातील आडमार्ग शोधणे, खिंडी घाट , चोरवाटा शोधणे असा शिवरायांचा नित्यक्रम सुरु झाला .
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.