!!शब्द !!
योग्य क्रमाने अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार होतो.
👉खालील अक्षरसमूह नीट वाचा व समजून घ्या :
१) ई + मा = ईमा ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही.
२) बा +आ = बाआ ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही .
३) व +ळा +का = वळाका ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही .
४) गा +ल+मु = गालमु ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही .
५) इ +म+स = इमस ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही .
👉आता खालील शब्द नीट वाचा व समजून घ्या:
१) मा + ई = माई ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
२) आ +बा = आबा ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
३) का +व +ळा = कावळा ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
४) मु+ल+गा = मुलगा ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
५) इ +स+म = इसम ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
अशा प्रकारे योग्य क्रमाने येणाऱ्या अक्षरांनी अर्थपूर्ण शब्द तयार होतो; म्हणून 'माई, आबा, कावळा, मुलगा, इसम ' हे अर्थपूर्ण शब्द आहेत.
----------------------------------------------------------------
💥दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द💥
घर ढग सन मन बस वर पळ
धर उठ चल गळ सण भर नळ
💥तीन अक्षरी अर्थपूर्ण शब्द💥
अजय गवत मदत मनन नमन
शरद वरण गरम बदक कमळ
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.