------------------------------
------------------------------
माझा आवडता खेळ
लपंडाव हा माझा आवडता खेळ आहे. याला लपाछपी असेही म्हणतात.
लपंडाव खेळायला अतिशय सोपा आहे.
याला कोणतेही साहित्य लागत नाही. फक्त लपण्यासाठी जागा लागतात.
त्यामुळे हा खेळ कुठेही खेळता येतो.
लपंडाव खेळात एकावर राज्य असते. तो डोळे झाकून घेतो.
बाकीचे लपतात. राज्य असलेला लपलेल्यांना शोधून काढतो.
आम्ही रोज संध्याकाळी हा खेळ खेळतो.
Tags:
मराठी निबंध
