-------------------------
-------------------------
दूरदर्शनवरील माझा आवडता कार्यक्रम
दूरदर्शनवर खूप कार्यक्रम असतात. मला त्यांतील प्राण्यांचे कार्यक्रम खूप आवडतात.
या कार्यक्रमांत खोल समुद्र पाहायला मिळतो. घनदाट जंगल पाहायला मिळते.
रंगीबेरंगी मासे, रंगीबेरंगी पक्षी, वाघ, सिंह असे सगळे प्राणी दिसतात.
ते खेळताना दिसतात. धावताना दिसतात. शिकार करताना दिसतात.
हे कार्यक्रम पाहताना मी जंगलात फिरतो, असे वाटते.
मोठा झालो की मी जंगलात फिरायला जाणार.
Tags:
मराठी निबंध
