------------------------------
------------------------------
माझे आवडते फूल - गुलाब
-----------------------------------------------------------------------------
गुलाब हे अत्यंत सुंदर फूल आहे. त्याचा रंग लाल, गुलाबी, पिवळा किंवा पांढराही असतो.
त्याला अनेक सुंदर सुंदर आकार आहेत. त्याचा सुगंध मनाला आनंद देतो.
म्हणून गुलाबाचे हारतुरे करतात.
गुलाबाच्या झाडाला काटे असतात. पण गुलाबाचे फायदेही आहेत.
त्याच्यापासून अत्तर बनवतात. गुलकंद बनवतात.
गुलाब हा फुलांचा राजाच आहे.
मला गुलाब खूप आवडतो.
Tags:
मराठी निबंध
