||श्री||
||जय जय रघुवीर समर्थ||
मनाचे श्लोक आणि अर्थ
विचारे मना तूचि शोधूनी पाहे
मना त्वाची रे पूर्व संचित केले
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले||११||
अर्थ:-
समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये सांगतात कि या संपूर्ण विश्वामध्ये असा कोणीच नाही कि ज्याला सर्वसुखाची प्राप्ती आहे. देवांना सुद्धा भोग होते. रामचंद्रांना वनवास भोगावा लागला, श्री कृष्ण स्वारींना तुरुंगात जन्म घ्यावा लागला, आईपासून दूर राहावं लागलं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फलप्राप्ती आहे. आपले भविष्य आणि नशीब हे पूर्णपणे आपल्या कर्मवरती अवलंबून असते. आपले या जन्मातील कर्मे आपल्या पुढच्या जन्मातील नशीब लिहीत असतात. ज्याप्रमाणे आपले मागील जन्मातील कर्मे आहेत त्यांची जशी शिल्लक आहे, तशेच भोग वर्तमानात आणि भविष्यात उभे असतात म्हणून समर्थ म्हणतात कि भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानातील कर्मे उत्तम केली तर प्रारब्ध उत्तमाचे होईल.
अर्थ
समर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये दुःख, शोक, चिंता याच विश्लेषण करतात.ज्यावेळी आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही, ज्यावेळी एखाद्या गोष्टीची प्राप्ती आपल्या मनाप्रमाणे आपल्याला होत नाही त्यावेळी आपल्याकडे राग, द्वेष, मत्सर यासारखे विषय येतात, परिणामी दुःख वाट्याला येते आणि जर एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली तर आनंद, प्रेम या भावना आपल्याकडे येतात पण तो आनंद जर प्रमाणात असेल तरच सुख प्राप्ती होते, अतिप्रमाणं झाले तर अभिमान आणि गर्व यासारखे विषय येतात. म्हणजेच काय तर, सुख आणि दुःख हे पूर्णपणे एखाद्या गोष्टीबद्दल धरलेल्या अपेक्षेवर, आशेवर अवलंबून आहे. समर्थ या श्लोकामध्ये सांगत आहेत कि ही देहबुद्धी म्हणजेच आपली या देहाबद्दल, आजूबाजूला असलेल्या नश्वर मायेबद्दल असलेली आसक्ती, अपेक्षा, ओढ ज्याचा काहीही फायदा आपल्याला नाही, ही अपेक्षा, ही आसक्ती आपल्याला सुखदुःखाच्या फेऱ्यातच अडकवणार आहे, म्हणून या देहबुद्धी आणि नश्वर मायेबद्दल कसलीही अपेक्षा न धरता जर आपण उत्तम, मंगल आचरण ठेऊन कर्म केली तर, सुख अथवा दुःख अशी परिस्तिथी येणारच नाही, परिणामी या व्यापातून मुक्ती मिळेल आणि स्वर्गीय आनंद लाभेल.
||जीवा कर्म योगे जनी जन्म झाला
परी शेवटी काळ मुखी निमाला
महा थोर ते मृत्यू पंथेची गेले
किती एक ते जन्मले आणि मेले||१३||
अर्थ
समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये मानवी जीवनाचं महत्व समजावून सांगितलं आहे. आपल्या पुराणांमध्ये लिहिलेले आहे कि या ब्रह्मांडामध्ये चौर्यांशी लक्ष जीव योनी आहे, त्र्याऐंशी लक्ष नऊव्यान्नवहजार नवशे नव्यान्नव जीव योनिनंतर, मानवी जन्म प्राप्त होतो. फक्त याच जन्मामध्ये हा प्राणी आपल्या इंद्रियांचा वापर करून कर्म करू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो, पाहू शकतो, इत्यादी. विवेकाने विचार केला तर समजेल कि फक्त मानवप्राणीच उत्तम भक्ती करू शकतो या इंद्रियांचा वापर उत्तम कार्य करण्यासाठी करू शकतो, हात जोडून वंदन करू शकतो, डोळ्यांनी उत्तम पाहू शकतो ग्रंथ वाचू शकतो, उत्तम काव्य लिहू शकतो, वाचेने उत्तम बोलू शकतो.असा हा मानवी जन्म कार्यकारण आपल्याला लाभलेला आहे, म्हणून मानवी जन्मात येऊन आज्ञेप्रमाणे उत्तम कर्म करून, भक्ती करून मोक्ष मिळवून या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पाडण्यासाठी हा मानवी जन्म प्राप्त झाला आहे असे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात.
कितीतरी लोक या पृथ्वीवरती जन्माला येतात, लहान मोठे, श्रीमंत गरीब, इत्यादी पण शेवटी मृत्यू हा अटळ आहे, तो प्रत्येकाला येतच असतो, या जन्म आणि मृत्यूमधील अंतर म्हणजेच जिवन जे मोक्षप्राप्तीसाठी उत्तम कर्माने पार पडायला हवे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात.
||मना पाहता सत्य हे मृत्यू भूमी
जिता बोल्ती सर्व ही जीव मी मी
चिरंजीव हे सर्व ही मानिताती
अक- स्मात सांडूनिया सर्व जाती ||१४||
समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपली स्वार्थी वागणुकीबद्दल विश्लेषण करून सांगतात. या सृष्टीमध्ये परमेश्वर सोडून प्रत्येक गोष्ट जन्माला येते आणि नाश ही पावते, जन्म आणि मृत्यू हे सत्य आहे नि अटळ आहे. परंतु आपणास वाटते कि आपण कधी मरणारच नाही, जन्माला आलोय तर मृत्यू हा येणारच हे विसरून गेलेलो असतो आपण, नि या संसार प्रपंचामध्ये अडकून जातो, या संसारमायेमध्ये कर्म करत असताना फळाची अपेक्षा धरून चालतो. अपेक्षा पूर्ण जरी झाली तरी त्यातून संतुष्टी मिळत नाही आणि अपेक्षा वाढतात पुन्हा त्या पूर्ण करण्यासाठी संसारमायेत फिरत बसतो.
मी किती कमवले पुढच्याने किती कमवले, माझे घर, माझी गाडी, माझे रान, ही स्वार्थी आणि मत्सरी वृत्ती ठेऊन जगत राहतो परंतु हे सर्व नाशिवंत आहे कधी ना कधी नष्ट होणार आहे असा विवेकाने विचार करायला हवा. जन्म जसा झाला मोकळ्या हातानी तसंच मृत्यूनंतरही अवस्था असते. मृत्यूनंतर हे सर्व माझं माझं झालेलं संसाराचं ओझं इथेच ठेऊन जावे लागते, सोबत असते ते फक्त कर्माप्रमाणे कमावलेली पापपुण्याची कमाई.
म्हणून जन्मी आल्यानंतर उत्तम कर्म करीत भक्तीमार्गात जिवन व्यतीत करण्यातच योग्यता आहे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात.
||मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
पुरेना जाणीई लोभ रे क्षोभ त्याते
म्हणनि जणी मागुता जन्म घेते||१५||
अर्थ :-
समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये लोभ आणि मत्सराची भावना व्यक्त करतात.
आपण आपल्या प्रियजनांचा मृत्यूनंतर दुःख करत बसतो, पण ज्याच्या समोर दुःख करत असतो तो एक पंचमहाभूतांचा निर्जीव पुतळा झालेला असतो, मागील जन्मी तो कोण असतो कोणाचा आई, बाप, बहीण, भाऊ असतो हे आपण सांगूही शकत नाही, प्रत्येकाच्या आत्म्यास ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे गती मिळत असते. नव्याचे नऊ दिवसाप्रमाणे हे दुःख असते, या जगामध्ये कोणावाचून कोणाचं काही अडत नाही, प्रत्येकजण स्वतःचा विचार करून शेवटी पुढे जात असतो नि कधी ना कधी मरण पावतोच. मग शोक का करावा? विवेकाने विचार केला तर धर्माचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो.
लोभ हा विषय खूप वाईट आहे. लोभाने जे हातात आहे ते सुद्धा निघून जाते, लोभामुळे मनुष्य जुगार, सट्टा अशा वाटमार्गाला लागून शेवटी व्यसनाच्या आहारी जातो आणि देशोधडीला लागतो. ज्या गोष्टीसाठी आपण लोभ धरतो त्यातून त्या गोष्टीबद्दल वासना जन्माला येते आणि वासनेचा गुणच आहे पुनर्जन्माचा.थोडक्यात एखाद्या गोष्टीबद्दलची अतिलोभाची भावना पुन्हा आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात ढकलते असे समर्थ या श्लोकामध्ये सांगतात.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.